प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खानने शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात झायेद खान, सुष्मिता सेन, अमृता राव आणि सुनील शेट्टी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत होते. फराहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्यांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यात आलेल्या आव्हानांबद्दल खुलासा केला आहे.

फराहने ‘मैं हूं ना’ मध्ये कास्टिंग करताना आलेल्या अडचणींचा अनुभव शेअर केला आणि तिच्या सर्व चित्रपटांसाठी शाहरुख खानने लगेच होकार का दिला याबद्दलही खुलासा केला आहे. मॅशेबल इंडियाच्या ‘द बॉम्बे ड्रीम शोम’ध्ये कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्याशी बोलताना फराह म्हणाली, “शाहरुख खान वगळता, मला माझ्या चित्रपटांमध्ये नेहमीच कास्टिंगशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतो. शाहरुख मात्र नेहमीच माझ्या चित्रपटात काम करण्यासाठी एका पायावर तयार असतो.”

आणखी वाचा : सेल्फीच्या निमित्ताने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या चाहत्याला काजल अग्रवालने हटकले; व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे फराह म्हणाली, “मैं हूं नाच्या वेळी आमच्याकडे कास्टिंग डायरेक्टर नव्हता त्यामुळे मी आणि माझे असिस्टंट आम्ही मिळूनच हे काम बघायचो. फक्त शाहरुख आणि सुष्मिता सेन यांना मी माझ्या चित्रपटात घेईन असे मी त्यांना खूप वर्षांपूर्वी सांगितले होते. शेवटच्या क्षणी झायेद खान चित्रपटात आला. झायेदच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन ही माझी पहिली पसंती होती. हृतिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ प्रदर्शित होण्यापूर्वीच मी हे ठरवले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हृतिक रातोरात स्टार झाला अन् त्याने ही भूमिका नाकारली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भूमिकेसाठी फराहने बऱ्याच लोकांना विचारलं होतं. फराह म्हणाली, “या भूमिकेसाठी मी अभिषेक बच्चनपासून सोहेल खानपर्यंत कित्येकांना विचारलं, पण सगळीकडून नकारच आला. इतकंच नव्हे तर चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या १५ दिवस आधी अमृता रावचं कास्टिंग फायनल झालं होतं. मी या भूमिकेसाठी आधी आयेशा टाकीयाला घेणार होते, पण इम्तियाज अलीने तिला ‘सोचा न था’साठी घेतलं होतं. त्यामुळे तीसुद्धा या प्रोजेक्टच्या बाहेर पडली.”