अभिनेत्री अमीषा पटेल सध्या ‘गदर २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ चित्रपटाच्या सीक्वेलला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं असून यामध्ये अमीषा पटेल आणि सनी देओल यांनी तारा-सकिनाच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ‘गदर २’ प्रदर्शित होण्यापूर्वी अमीषाने अनिल शर्मा यांच्या प्रोडक्शन टीमवर मानधनासंदर्भात गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रीचे हे आरोप अनिल शर्मांनी स्पष्टीकरण देत फेटाळून लावले होते. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमीषाने भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध!” जालना लाठीचार्ज प्रकरणी मराठी अभिनेत्याने केलं ट्वीट; म्हणाला, “राजकारणासाठी…”

‘गदर’ फेम अमीषा पटेल न्यूज १८ शी संवाद साधताना म्हणाली, “अनिल शर्मा आणि माझ्यात आधीपासून अगदी पहिल्या गदरपासून मतभेद होते. पण, तरीही सेटवर आम्ही एका कुटुंबाप्रमाणे असतो. सकिना हे पात्र शक्तिमानजी यांनी लिहिलेलं आहे, अनिल शर्मांनी नाही. झी वाहिनीने माझी या भूमिकेसाठी निवड केली होती. अन्यथा अनिल शर्मांना ममता कुलकर्णीला या भूमिकेसाठी घ्यायचं होतं. ‘तारा’च्या भूमिकेसाठी सुद्धा अनिल शर्मांची पहिली पसंती गोविंदा होते. पण, झी वाहिनीने सनी देओलचं नाव पुढे केलं. चॅनेल आणि सनी देओल यांच्यामुळे मी ‘गदर’ चित्रपटात काम केलं.”

हेही वाचा : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची अमृता खानविलकर; बालपणीचा किस्सा सांगत म्हणाली, “त्यांनी मला रात्रभर…”

सेटवरील कर्मचाऱ्यांच्या थकित मानधनाविषयी अभिनेत्री दावा करत म्हणाली, “अनिल शर्मांच्या प्रोडक्शन हाऊसबाबत आणि सिम्रत कौरच्या व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओसंदर्भात मी अनेक ट्वीट केले होते. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचं मानधन मिळालं नव्हतं. परंतु, हे सगळे ट्वीट्स अनिल शर्मांनी विनंती केल्यामुळे मी डिलीट केले. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत. झी स्टुडिओजने या समस्या सोडवल्या.”

हेही वाचा : “…म्हणून माझ्या लग्नात दाक्षिणात्य पद्धतीचा पोशाख होता”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवाली रांगोळेनं सांगितला खऱ्या लग्नाचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनिल शर्मांनी मला अनेक गोष्टी सांगूनही त्या पूर्ण केल्या नाहीत. याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. पण, मी म्हटल्याप्रमाणे आम्ही एक कुटुंब असल्याने मी या गोष्टी बाहेर काढत नाही. गदरपासून गेल्या २३ वर्षांमध्ये आमच्यात अनेकदा भांडणं झाली, तरीही ‘गदर ३’ साठी विचारणा झाल्यास मी काम करेन. फक्त तारा-सकिनाचा स्क्रिनिंग टाइम ‘गदर’प्रमाणे जास्त वेळ असावा ही माझी अट असेल. अन्यथा, मी ‘गदर ३’ करणार नाही. कारण, ‘गदर २’ मध्ये अनिल शर्मांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच उत्कर्षला पुढे करण्याचा प्रयत्न केला…तारा-सकिनाला डावलून त्या दोघांवर जास्त लक्ष दिलं गेलं याचं मला फार वाईट वाटलं. पण, अखेर तारा आणि सकिनाची जादू चित्रपटगृहांमध्ये चालली.” असं मत अमीषाने मांडलं.