बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या ‘गदर २’मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. अमीषा आणि सनी देओल यांनी साकारलेल्या तारा-सकिनाच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘गदर २’च्या निमित्ताने अमीषाने तब्बल पाच वर्षांनी चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं. यापूर्वी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘भैयाजी सुपरहिट’ चित्रपटाने फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. ‘गदर २’ येण्यापूर्वीचे तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले यावेळी तिला ‘फ्लॉप करिअर’ अशा टीकेचा सामना करावा लागला. याविषयी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “मासिक पाळीबद्दल पहिलं वडिलांना सांगितलं”, अतिशा नाईक यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाल्या, “खूप घाबरले अन्…”

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अमीषा पटेल म्हणाली, “बॉलीवूडमध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जातं. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्या अभिनेत्रींना कोणाचाही पाठिंबा नसतो. मी चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आले असते किंवा इंडस्ट्रीमध्ये माझा कोणी गॉडफादर असता तर माझ्यावर फ्लॉप करिअर अशी टीका झाली नसती, मला टार्गेट केलं नसतं. याउलट मला अजून चांगले चित्रपट मिळाले असते.”

हेही वाचा : Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधान म्हणाली, “ठाण्यावरून….”

अमीषा पुढे म्हणाली, “बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालले नाही की, निर्मात्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. अशा अनेक निर्मात्यांकडून मी मानधन घेतलेलं नाही. दुसऱ्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेणं खूप आवश्यक असतं. मला मानधन नको घेऊस असं कोणीही सांगितलं नव्हतं मी निर्मात्यांची परिस्थिती पाहून स्वत:हून हा निर्णय घेतला होता.”

हेही वाचा : ‘जवान’चा ट्रेलर पाहून राजकुमार हिरानी यांनी केला शाहरुखला मेसेज; अभिनेता खुलासा करत म्हणाला, “मी त्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली. परंतु, या गोष्टींचा मी माझ्या मनावर परिणाम होऊ दिला नाही. मी फक्त उत्तम काम करण्यावर लक्ष केंद्रित केलं.” असं अमीषाने सांगितलं. दरम्यान, अमीषा पटेलने ‘गदर’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये सकिनाची भूमिका साकारली आहे. ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ ने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे.