सध्या सुपरहिट ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला होता. ‘गदर’च्या यशानंतर काही दिवसांपूर्वी ‘गदर २’ ची ही घोषणा करण्यात आली होती. ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पण त्यापूर्वी ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटालाही चित्रपटगृहात पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता सनी देओलने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
२३ वर्षांनंतर ‘गदर’ पुन्हा एकदा सिक्वेलसह प्रदर्शित होत आहे. याबाबत सनी देओलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सनीने लिहिले, “तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळेस अनुभव वेगळा असेल. ९ जून रोजी ‘गदर एक प्रेम कथा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. तर ‘गदर २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गेल्या वर्षीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती.
‘गदर २’ चित्रपटातील सनी ची पहिली झलक काय दिवसांपूर्वी समोर आली होती. ‘झी स्टुडिओज’च्या एका व्हिडीओमध्ये तो बैलगाडीचा चाक उचलताना दिसला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो हातात मोठा हातोडा घेऊन उभा दिसला होता. त्या पाठोपाठ आता या चित्रपटातील एक ॲक्शन सीनचा बिहाइंड द सीन व्हिडीओ आऊट झाला होता.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता जवळपास २३ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.