बॉलिवूडचा दबंग सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा मारेकरी कुख्यात गँगस्टर सतविंदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमान खान हे त्याचे टार्गेट असून संधी मिळताच त्याला मारून टाकू, असे त्याने म्हटले आहे. याशिवाय सिद्धू मुसेवालाची हत्या त्याच्या टोळीने केल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

हेही वाचा- ‘द आर्चीज’नंतर मोठ्या पडद्यावर झळकणार बाप-लेकीची जोडी? शाहरुख खानची सुहानासाठी विशेष तयारी

इंडिया टुडेशी बोलताना गोल्डी ब्रार म्हणाला, “आम्ही त्याला नक्कीच ठार करु. भाई साहिब (लॉरेन्स बिश्नोई) यांनी त्याला माफी मागायला सांगितली पण तिने तसे केले नाही. जसे आम्ही आधीही सांगितले आहे. सलमान खानचे नाही. जो कोणी आमचा शत्रू असेल त्यांना आम्ही मारून टाकू. सलमान खान आमचे टार्गेट आहे.”

हेही वाचा- नवाजुद्दीन सिद्दिकीने कंगना रणौतचं केलं कौतुक, इच्छा व्यक्त करत म्हणाला, “तिच्याबरोबर…”

गोल्डी ब्रारनेही सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, “तो खूप गर्विष्ठ आणि बिघडलेला होता. आणि त्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसे होते. त्याच्याकडे अत्याधिक राजकीय आणि पोलिस शक्ती होती ज्याचा त्याने गैरवापर केला. त्याला धडा शिकवणे गरजेचे होते.”

यापूर्वीही अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सतत मिळणाऱ्या या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ सुरक्षा दिली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने सुरक्षिततेसाठी बुलेटफ्रुट कारही खरेदी केली होती.