अभिनेत्री जिनिलीया देशमुखचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जिनिलीयाबरोबर मानव कौल मुख्य भूमिका साकारणार आहे. सध्या अभिनेत्री ‘ट्रायल पीरियड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने चित्रपटाचे कथानक, मोठ्या पडद्यावर दाखवले जाणारे रोमॅंटिक सीन्स याबाबत भाष्य केले आहे.

हेही वाचा : “रेड लिपस्टिक लावायला घाबरायचे”, कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “शोमध्ये माझ्या ओठांची…”

‘झूम’ वाहिनीच्या मुलाखतीत जिनिलीयाला “चित्रपटात कोणतीही भूमिका करण्याआधी तू तुझ्या मुलांचा विचार करतेस का? किंवा सध्या भूमिकांची निवज कशी करतेस?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या प्रत्येक भूमिकेचा विचार करते. अनेकदा एखाद्या कथेसाठी विशिष्ट सीन्स चित्रित करायचे असतात. पण खरं सांगायचं झालं तर, मी ऑनस्क्रीन किसिंग सीन करू शकत नाही, असे सीन्स शूट करताना मला अवघडल्यासारखं वाटतं. मी स्क्रीनवर कधीच खोटा अभिनय करू शकणार नाही.”

हेही वाचा : “पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष निवडला”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, “न्यूयॉर्क विद्यापीठात…”

जिनिलीया पुढे म्हणाली, “ज्या भूमिका करण्यासाठी माझी मानसिकदृष्ट्या तयारी आहे, ज्या मला सोयीस्कर वाटतात अशाच भूमिकांची मी निवड करते. कारण, प्रत्येक गोष्ट मनापासून केली पाहिजे, इच्छेशिवाय तुम्ही पडद्यावर अभिनय करत असाल किंवा एखादे पात्र साकारणार असाल तर, तुम्ही लोकांना काय सांगणार? त्यामुळे मी नक्कीच या सगळ्याचा विचार करते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “बघता बघता १३ वर्ष गेली सुद्धा…”, लेकीसाठी जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणाला “तिची स्वत:शी…”

दरम्यान, जिनिलीया देशमुखचा ‘ट्रायल पीरियड’ हा चित्रपट २१ जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शक्ती कपूर, शीबा चड्डा, गजराज राव आणि झिदान ब्राझ सहायक भूमिकांमध्ये आहेत.