नव्वदच्या दशकातला हिरो नं. १ गोविंदा मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब राहिला आहे. तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये त्याचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे त्याने सिनेमांपासून ब्रेक घेत इतर गोष्टींवर लक्ष देण्याचे ठरवले. गोविंदा मोठ्या पडद्यावर दिसत नसला, तरी तो टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर अधूनमधून झळकत असतो. दिवाळी निमित्त त्याने ‘इंडियन आयडल १३’ या कार्यक्रमामध्ये हजरी लावली होती. त्यावेळी त्याच्याबरोबर पत्नी सुनीता अहुजा देखील तेथे उपस्थित होत्या.

गोविंदा त्याच्या चाहत्यांचा लाडका आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘चीची भैय्या’ म्हणून संबोधतात. काल गोविंदा आणि सुनीता अहुजा बाहेरगावी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते. तेव्हाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदासारखा दिसणारा त्याचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी विमानतळाच्या बाहेर वाट पाहत असलेला दिसत आहे. जसा गोविंदा गाडीतून बाहेर येतो, तसा त्याचा हा चाहता त्याची भेट घेण्यासाठी पुढे येतो. गोविंदा त्याला पाहून पुढे यायला सांगतो. सुनीता अहुजा यांना लांबून नमस्कार म्हणत तो चाहता प्रथम गोविंदाच्या पाया पडतो आणि नंतर त्याच्या हातामध्ये असणारा पुष्पगुच्छ गोविंदाला देतो असे दिसते.

आणखी वाचा – बॉलिवूड इंडस्ट्री संपली का? रकुल प्रीत म्हणाली, “लोकांना आता…”

त्यानंतर ते दोघे फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यासमोर पोझ देतात. दरम्यान त्यांच्याकडे पाहत सुनीता “एकदम कार्बन कॉपी दिसत आहेत ना..” असे म्हणतात. फोटो काढल्यानंतर गोविंदा त्या चाहत्यासह थोडा वेळ बोलतो. बोलताना तो गोविंदाला “याआधी आपली भेट २३ वर्षांपूर्वी झाली होती”, असे सांगतो. पुढे गोविंदा आणि सुनीता विमानतळाच्या आतमध्ये जातात. चाहत्याला छान वागणूक दिल्यामुळे गोविंदाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. गोविंदासारखा हूबेहूब लूक केल्याने त्या चाहत्याबद्दलही चर्चा आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओखाली एका यूजरने गंमत म्हणून “यातला खरा गोविंदा कोण आहे?” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने “मला तर लाल रंगाचा सूट घातलेला गोविंदा वाटतोय..” असे म्हटले आहे.