अभिनेता गोविंदाला राहत्या घरात परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली. पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील जुहूमध्ये त्याच्या घरात ही घटना घडली. आता गोविंदाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती त्याचा मॅनेजर शशी सिन्हाने दिली.

हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती

गोविंदाची प्रतिक्रिया

“नमस्कार, मी गोविंदा.. तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. मला पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.

हेही वाचा – सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

गोविंदाच्या मुलीची प्रतिक्रिया

Govinda Daughter Reaction: गोविंदाची मुलगी टीना आहुजा हिने इंडियन एक्सप्रेसला वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. “मी सध्या आयसीयूमध्ये बाबांबरोबर आहे. मी आता जास्त बोलू शकत नाही… पण त्यांची प्रकृती आता बरी आहे. गोळी लागल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या आहेत, त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत,” असे टीना आहुजा म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गोविंदाजवळची परवाना असलेली बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.