Mandira Bedi Birthday : अभिनेत्री मंदिरा बेदीचा आज ५१ वा वाढदिवस आहे. या वयातही ती तितकीच हॉट आणि ग्लॅमरस आहे. मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या पडद्यावर जादू केली होती. आज १५ एप्रिल रोजी मंदिराचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

अभ्यासात हुशार नव्हती तेजस्वी प्रकाश, एका प्रश्नपत्रिकेसाठी मोजलेले ‘इतके’ रुपये; म्हणाली, “मी परीक्षेत…”

एका मुलाखतीमध्ये मंदिराने तिला आई होण्याचा अनुभव लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी घेता आल्याचा खुलासा केला होता. मंदिराने त्यामागील कारणही सांगितले होते. मंदिरा बेदीने १९९९मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले. मात्र आई होण्यासाठी मंदिराला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. “मी केलेल्या करारामुळे २००१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. मला भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल”, असे मंदिरा म्हणाली होती.

आवडता मराठी चित्रपट कोणता? रोहित शेट्टी म्हणाला, “मला निळू फुलेंचा…”

पुढे मंदिरा म्हणाली, “कधीकधी हे मनोरंजन क्षेत्र क्रूर आहे असे वाटते. इथे कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. पण या इंडस्ट्रीमध्ये निभावण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला पाठिंबा दिला. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी या इंडस्ट्रीमध्ये जगू शकले नसते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नाच्या तब्बल १२ वर्षानंतर २०११ मध्ये मंदिराने वीर या आपल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने एका मुलीला दत्तक घेतले. मंदिराने तिच्या मुलीचे नाव तारा असे ठेवले आहे. दरम्यान, पतीने करिअरमध्ये मदत केली म्हणणाऱ्या मंदिराचा पती राज कौशलचं ३० जून २०२१ रोजी मुंबईत हार्ट अटॅकने निधन झालं.