अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून सध्या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काही महिन्यांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. शिवाय मध्यंतरी यात अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन यात दिसणार असल्याच्या बातमीमुळेही चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता अखेर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून या चित्रपटातील त्रिकुटांचा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये परेश रावल बाबुभाईच्या गेटअपमध्ये तर अक्षय कुमार राजुच्या गेटअपमध्ये दिसत आहे. सुनील शेट्टी मात्र साध्याच कपड्यांमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा : यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर राम चरण थिरकणार? आनंद व्यक्त करत अभिनेता म्हणाला…

बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार या चित्रपटाचं नाव ‘हेरा फेरी ३’नसून ‘हेर फेरी ४’ आहे आणि यामागील कारण या नव्या प्रोमोमध्ये दडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.आता या ‘हेरा फेरी ४’बद्दल आणखी एक धमाल गोष्ट समोर आली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या सूत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय दत्तने एक नवा चित्रपट स्वीकारला आहे ज्यात तो एका आंधळ्या आणि तितक्याच विचित्र अशा खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “संजय दत्तने विनोदी भूमिकादेखील उत्तमरित्या निभावल्या आहेत. ‘हेरा फेरी’ युनिव्हर्समध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आणि धमाल आणण्यासाठी निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय खूप योग्य आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ४’ची आतुरतेने वाट बघत आहेत.