Housefull 5 Trailer : ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. आतापर्यंत या सिनेमाचे एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच ‘हाऊसफुल’चा बहुप्रतीक्षित पाचवा भाग प्रदर्शित होणार आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ चित्रपट येत्या ६ जूनला रिलीज होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या ३ मिनिटं ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी, हटके कॉमेडी आणि थ्रिलर ट्विस्ट या गोष्टी पाहायला मिळतात. रणजीत त्यांची संपूर्ण संपत्ती जॉलीच्या नावावर करतात. याच जॉली नावामुळे कसा गोंधळ निर्माण होणार याची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. जॉली क्रमांक १- रितेश देशमुख, जॉली क्रमांक २- अभिषेक बच्चन आणि जॉली क्रमांक ३ म्हणजेच अक्षय कुमार या तिघांची नावं सारखी असल्याने क्रूझवर मोठा गोंधळ होतो.

मात्र, आता हा खरा जॉली नेमका कोण आहे? जॉलीची खरी ओळख पटेपर्यंत सिनेमात कोणाचा खून होणार? या मर्डर मिस्ट्रीमागचा खरा व्हिलन कोण आहे याचा उलगडा ६ जूनला चित्रपटगृहात होणार आहे. जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त पोलिसांच्या रुपात चौकशीसाठी क्रूझवर येत असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तर, शेवटी नाना पाटेकरांचा देसी लूक अन् जबरदस्त एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेते.

‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, डिनो शर्मा, डीनो शर्मा, डीनो शर्मा, रणजी शर्मा, नाना पाटेकर, आणि आकाशदीप साबीर असे एकूण २० दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवालाची निर्मिती असलेला हाऊसफुल ५ सिनेमा ६ जून २०२५ रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. आता ‘हाऊसफुल ५’ची जादू बॉक्स ऑफिसवर चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.