हृतिक रोशन व दीपिका पदुकोण अभिनीत ‘फायटर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे हृतिक, दीपिकाच्या चाहत्यांमध्ये ‘फायटर’विषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतीच या चित्रपटाची सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण चित्रपटातील काही डायलॉग आणि सीन्सवर कात्री लावली गेली.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. शिवाय चित्रपटातील ‘इश्क जैसा कुछ’ आणि ‘शेर खुल गए’ या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आता २५ जानेवारीपासून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्यापूर्वी सीबीएफसीने चित्रपटात चार मोठे बदल केले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’मधून बाहेर येताच आयशा खानचा मुनव्वर फारुकीवर निशाणा, पोस्ट करत म्हणाली, “पिक्चर अभी बाकी…”

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, चित्रपटातील धूम्रपान विरोधातील संदेश हिंदीत दाखवण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तसेच आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्यास किंवा म्यूट करण्यास सांगितलं आहे. सीबीएफसीकडून आदेश देण्यात आले आहेत की, टीव्ही न्यूजच्या सीन्समधील २५ सेकंदाचा ऑडिओ पार्ट ऐवजी २३ सेकंदाचा ऑडियो पार्ट ठेवा. शिवाय ८ सेकंदाच्या सेक्युअल सजेस्टेंड विज्युअल्स हटवण्याचा आदेश दिला. या बदलानंतरच ‘फायटर’ चित्रपटाला यू/एकडून पास दिला गेला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हृतिक, दीपिकाच्या या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘फायटर’ चित्रपटाचे अॅडवॉन्स बुकिंग २० जानेवारीपासून सुरू झाले आहे. माहितीनुसार, आतापर्यंत या चित्रपटाची कमाई दोन कोटीपर्यंत झाली आहे.