हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाला चाहते, समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २२.५ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये हळूहळू वाढ होत आहे. ‘फायटर’ या चित्रपटाने शनिवारी २८ कोटींहून अधिक कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : दारूच्या बाटलीवरुन नोकराला मारहाण; राहत फतेह अली खान यांच्या व्हायरल व्हिडीओमागील नेमकं सत्य जाणून घ्या

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिक’च्या रिपोर्टच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार ‘फायटर’ने तिसऱ्या दिवशी २७.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी २६ जानेवारीला ३९.५ कोटींची कमाई केली होती. यासह, या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ८९.५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे त्यामुळे लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘फायटर’च्या सकाळच्या शोलादेखील चांगली गर्दी होताना पाहायला मिळत आहे. तर संध्याकाळ व रात्रीचे शो हे जबरदस्त गर्दीत हाऊसफूल होत आहेत. इतकंच नव्हे तर समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला असून येत्या रविवारी या कमाईच्या आकड्यात आणखी वाढ होणार याची शक्यता आहे. ‘पठाण’ आणि ‘वॉर’ फेम सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय वायु सेनेच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला श्रद्धांजली म्हणून सादर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवार २५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांच्यासह अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन व दीपिका पदूकोण ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसली अन् प्रेक्षकांना ती पसंतही पडली. तसेच चित्रपटातील काही बोल्ड सीन्सवर सेन्सॉरने कात्री चालवल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.