अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत असतो. सुझान खानला घटस्फोट दिल्यानंतर तो अनेक महिन्यांपासून सबा आझादला डेट करत आहे. ती दोघं अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. पण आता त्यांच्याबरोबर हृतिकची दोन्ही मुलंही दिसली.

सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशनचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विमानतळावरचा आहे. २०२२ हे वर्ष लवकरच संपणार आहे आणि त्यानिमित्त हृतिक रोशन सबा आझादबरोबर त्याच्या दोन्ही मुलांना घेऊन व्हेकेशनसाठी परदेशात रवाना झाला आहे.

आणखी वाचा : गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू…शाहनवाजशी लग्नगाठ बांधल्यावर देवोलिना भट्टाचार्जीची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी

हेही वाचा : हृतिक रोशनने चाहत्यांकडे केली मोठी मागणी; म्हणाला, “कृपया मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत हृतिक त्याच्या गाडीतून उतरून विमानतळावर येताना दिसतोय. यावेळी त्याच्याबरोबर सबा आणि त्याची दोन मुलंही आहेत. हृतिक अनेकदा सुझान आणि त्याच्या मुलांबरोबर एकत्र दिसतो पण आता त्याच्या मुलांना तो सबाबरोबर सुट्ट्यांचा आनंद उपभोगायला घेऊन गेला असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.