कोई मिल गया हा भारतातील पहिला सुपरहिरो चित्रपट होता. ८ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपटाला प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, PVR आयनॉक्स हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हेही वाचा- धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, “समस्या असतील तर…”

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘कोई मिल गया’ पुन्हा प्रदर्शित करण्याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाला की हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सच्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला होता. मीही त्यांच्या कल्पनेला लगेच सहमती दर्शवली. चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना ते म्हणाले ““आम्हाला ‘कोई मिल गया’ हा लहान मुलांच्या चित्रपटासारखा बनवायचा होता. ज्याचा आनंद मुले आणि त्यांचे कुटुंब दोघेही घेऊ शकतात. एलियन्सवर सायन्स फिक्शन फिल्म बनवणं हा चित्रपट निर्माता म्हणून मी घेतलेला जोखमीचा निर्णय होता. पण त्या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. या चित्रपटाच्या यशामुळे विविध शैलीतील चित्रपट बनवण्याचा आणि प्रयोगशील असण्याचा माझा विश्वास दृढ झाला आहे.”

हेही वाचा- अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’च्या ट्रेलरचं प्रेक्षक करतायत कौतुक; म्हणाले, “यावेळी ‘गदर २’ ला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोई मिल गया’ ८ ऑगस्ट २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. या कथेच्या पात्रांवर पुढे दोन चित्रपट बनले आहेत. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३. आता लवकरच क्रिश ४ ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला चित्रपट आहे, ज्याच्या पात्रांवर वेगवेगळ्या कथानकांसह चित्रपट बनवले गेले. ‘कोई मिल गया’मध्ये हृतिक रोशन, प्रिती झिंटा, रेखा, रजत बेदी, प्रेम चोप्रा आणि हंसिका मोटवानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.