बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. सध्या हृतिक रोशन आणि सबा आझाद बॉलिवूडच्या बहुचर्चित जोड्यांपैकी एक मानले जातात. बरेचदा या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी डिनर तर कधी बॉलिवूड पार्टी असं हे दोघं सध्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर दिसतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावरून हृतिकला नेटकरी ट्रोल करत आहे.

हृतिक सबा नुकतेच डिनर डेटला गेले होते. हॉटेलातून बाहेर पडताना दोघे एकत्र बाहेर पडले. हॉटेलातून बाहेर पडताना साहजिकच पापाराझी आणि चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यातील काही चाहत्यांनी हे दोघे गाडी कडे जात असताना सबाकडे सेल्फी घेण्यासाठी तेव्हा हृतिकने त्याला ढकलून दिले आणि दोघे गाडीत बसून निघून गेले.

शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…

हृतिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला सुनावले आहे. एकाने लिहले आहे “हृतिक तुला लाज वाटायला हवी, तू नाही म्हणू शकत होतास,” तर दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवूडच्या फालतू लोकांची फालतू वृत्ती आहे ही,” तिसऱ्याने तर लिहले आहे “जर दाक्षिणात्य स्टार्स कडून शिका तुमच्यापेक्षा त्यांची क्रेझ जास्त आहे.” अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हृतिक रोशनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘फायटर’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणसह दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रिन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.