Amitabh Bachchan Gets Trolled : दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी कर्माचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या जातात. बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांच्या घरातील मदतनीसांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व रोख रक्कम दिली होती. परंतु, यामुळे ते आता ट्रोल होत आहेत.
सोशल मीडियावर एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला असून, हा व्हिडीओ बिग बींच्या जुहू येथील जलसा बंगला येथील असल्याचं दिसतं. या व्हिडीओमधून तो यावेळी तेथील कर्माचाऱ्यांशी संवाद साधताना आणि त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतोय.
इन्फ्लुएन्सरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो तुम्ही बघू शकता की, येथे मिठाई वाटली जात आहे, असे म्हणत तेथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील एका कर्मचाऱ्याशी तो संवाद साधताना दिसतो. मिठाईच्या बॉक्ससह त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिल्याचं म्हटलं जातं. यावेळी त्यानं किती पैसे मिळाले, असं विचारल्यानंतर तेव्हा तिथे असलेल्या व्यक्तीनं १० हजार, असं उत्तर दिलंय.
सोशल मीडियावरील या व्हिडीओखाली अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एकानं कमेंट सेक्शनमध्ये, “फक्त दहा हजार”, दुसऱ्याने “अरे, ते तर ‘बिकाजी’चे ब्रॅण्ड अॅम्बेसडर आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळं फुकट मिळालं असेल आणि त्यामुळे ते तेच देत आहेत.” तर एकानं, “ते अजून वेगळं काहीतरी देऊ शकले असते”, असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडीओखाली काहींनी कमेंट्स करीत बिग बींवर टीका केल्यानंतर काहींनी मात्र त्यांना पाठिंबा दिल्याचं दिसतं. काहींनी याच व्हिडीओखाली एकानं, “जेव्हा कोणीतरी काही देत असतं तेव्हा तुम्ही तक्रार न करता, त्याचा स्वीकार केला पहिजे”, दुसऱ्यानं,”विचार करा त्यांच्या घरात किती कर्मचारी असतील. त्यामुळे प्रत्येकी १० हजार द्यायचे म्हणजे विचार करा. किती पैसे होतील” अशा कमेंट्स केल्या गेल्या आहेत.
