बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. रणबीर कपूर आणि आलियाच्या बाळासाठी चाहतेही आतुर आहेत. आलिया-रणबीरने एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर काहीच महिन्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची बातमी चाहत्यांना दिली. आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडी गूड न्यूज देण्याच्या तयारीत असल्याची शंका चाहत्यांना आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची पत्नी पत्रलेखादेखील प्रेग्नंट आहे का?, असं प्रश्न चाहत्यांना पडला आहे. राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राजकुमार राव त्याच्या पत्नीसह पापाराझींसमोर फोटोसाठी थांबलेला दिसत आहे. दरम्यान त्याची पत्नी पत्रलेखाला खोकला लागल्याचं दिसत आहे. राजकुमार राव त्याच्या पत्नीची काळजीही घेताना दिसत आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म

हेही वाचा >> उर्वशी रौतेलाने इराणमधील महिलांसाठी कापले केस, पोस्ट शेअर करत म्हणाली “हिजाबविरोधी…”

राजकुमार राव आणि पत्रलेखाचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्याकडे गूड न्यूज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “राजकुमार रावची पत्नी गरोदर आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पत्रलेखा गरोदर आहे का?”, अशी कमेटं केली आहे. एका नेटकऱ्याने “राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीला अभिनंदन”, अशी कमेंट करत थेट शुभेच्छाच दिल्या आहेत.

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाही एक अभिनेत्री आहे. या दोघांनी नोव्हेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधली. येत्या १५ नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे. राजकुमार राव आणि त्याच्या पत्नीकडे खरंच गोड बातमी आहे का?, हे लवकरच कळेल.