बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. आर्यन खान बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आर्यन खान व नोरा फतेहीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, नोरा फतेही शाहरुखचा मुलगा आर्यनला डेट करत आहे. त्यांचे पार्टीतील काही फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. आर्यन व नोराच्या कॉमन मित्राद्वारे शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये त्या दोघांनाही स्पॉट करण्यात आलं आहे.

हेही वाचा>> बिपाशा बासूने शेअर केला लेकीला स्तनपान करतानाचा व्हिडीओ, म्हणाली…

हेही वाचा>> “तुनिषाची आत्महत्या, भीतीचं वातावरण अन्…”, पाच दिवसांनी मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

नोरा फतेही व आर्यन खानच्या फातिमा राजा या मैत्रिणीने दुबईतील त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन नोरा व आर्यन डेट करत असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा>>“एक सुंदर मुलगी मला भेटायला आली आणि…”, प्रसाद ओकने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आर्यन खान बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज आहे. लवकरच तो दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बॉलिवूडमधील त्याच्या करिअरला सुरुवात करणार आहे. नोरा फतेही १०० पर्संट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.