मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने २००६ मध्ये शाहरुख खानच्या ‘डॉन’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, त्या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच २०११ मधील ‘डॉन २’मध्ये तिला भूमिका मिळाली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल आपले मत व्यक्त केले होते.

‘गलटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा कोप्पीकरने ‘डॉन’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “’डॉन’ चित्रपटात मला भूमिका करण्याची संधी मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता, मात्र मला असे वाटले की प्रियांका चोप्राची भूमिका माझ्या भूमिकेपेक्षा अधिक प्रभावशाली होती. तिची भूमिका अधिक सशक्त होती आणि ती खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आली होती. त्या भूमिकेसाठी मी काहीही केलं असतं. मी २५ वर्षांपासून तायक्वांदो शिकत आहे आणि ब्लॅक बेल्ट आहे. ॲक्शन सीन्समध्ये मी कुठल्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते.”

हेही वाचा…जान्हवी कपूरचं टी-शर्ट पाहिलंत का? बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या नावाने वेधलं लक्ष, पाहा फोटो

‘डॉन २’मध्ये भूमिका मिळाली नसल्याची खंत’

२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन २’ या सिक्वलमध्ये ईशाला भूमिका देण्यात आली नाही, याचा तिला खूप राग आला आणि दुःखही झाले. ती म्हणाली, “मला ‘डॉन २’ सिनेमात भूमिका मिळावी यासाठी मी निर्मात्यांशी स्वतःहून संपर्क साधला होता, पण मी संपर्क साधण्याआधीच त्या भूमिकेचे कास्टिंग झाले आहे असं मला सांगण्यात आलं. हे ऐकून सुरुवातीला मला खूप वाईट वाटले, पण नंतर मी त्याकडे दुर्लक्ष केलं.”

हेही वाचा…जुनैदच्या हिरोईनने आमिर खानला ओळखलंच नाही; मेसेजवर विचारलं ‘तुम्ही कोण?’, अभिनेत्रीने स्वतःच सांगितला किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहान अख्तरने २००६ मध्ये अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘डॉन’चा रिमेक केला होता. या चित्रपटात शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, अर्जुन रामपाल आणि ईशा कोप्पीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. २०११ मध्ये ‘डॉन २’ हा सिक्वल प्रदर्शित झाला. शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, बोमन इराणी, लारा दत्ता, ओम पुरी आणि कुणाल कपूर हे कलाकार त्यात झळकले होते. आता फरहान अख्तर ‘डॉन ३’ तयार करणार आहे. रणवीर सिंग नव्या चित्रपटात ‘डॉन’ची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.