राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मुड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला या गाण्यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या. पण नंतर मात्र काहींनी अमृता यांच्या या गाण्याचं कौतुकही केलं. काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांना पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

अमृता यांच्या गाण्याबरोबरच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगताना दिसते. अमृता यांची ड्रेसिंग स्टाइल अनेकांना आवडते. तर काहीजण त्यांना ट्रोलही करतात. असंच एका कार्यक्रमानिमित्त घडलं. अमृता यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी परिधान केलेला ड्रेस नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला नाही.

अमृता यांनी या कार्यक्रमादरम्यान वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. गुलाबी रंगाचं टीशर्ट व त्यावर मल्टी कलर पँट अमृता यांनी परिधान केली होती. त्यांच्या या ड्रेसिंग स्टाइलमुळे त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. असे कपडे परिधान करणं तुम्हाला शोभत नाही, फॅशनच्या नावाखाली नीट फॅशन करा, ड्रेस थोडा चांगला परिधान करायला हवा होता अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कमेंट केली आहे. त्यांनी या फोटोंवर टाळी वाजवतानाचं इमोजी शेअर करत कमेंट केली. तर काहींनी अमृता यांच्या या नव्या लूकचं कौतुकही केलं.