दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला जवळपास सहा वर्षे झाली आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचे ५४ व्या वर्षी दुबईमध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबाला व चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’च्या ताज्या भागात हजेरी लावली. श्रीदेवींचे निधन झाले तेव्हा त्या भारतात होत्या. आईच्या निधनाची बातमी कळाल्यावर आपली परिस्थिती कशी होती, याबाबत दोघींनी खुलासा केला.

“जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते आणि मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. मी रडत- रडत तिच्या खोलीत गेले, पण मला आठवतंय तिने माझ्याकडे पाहिलं आणि ज्या क्षणी तिनं माझ्याकडे पाहिलं, तिचं रडणं थांबलं. रडणं थांबवून ती माझ्या शेजारी बसली आणि मला धीर देऊ लागली. आणि तेव्हापासून मी तिला कधीही रडताना पाहिले नाही,” असं जान्हवी खुशीबद्दल म्हणाली. खुशी म्हणाली की ती सर्वात लहान असूनही ती तिच्या कुटुंबासाठी मजबूत राहिली. “मला वाटतं की सर्वांसाठी मी मजबूत राहणं गरजेचं होतं,” असं खुशी म्हणाली.

‘तू शिखर पहारियासह डेट करतेयस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर जान्हवी कपूर म्हणाली, “त्याला माझ्याकडून…”

एखाद्या गोष्टीबद्दल भावनिक झाल्यावर त्या भावना एकमेकींना दाखवत नसल्याचं जान्हवी व खुशीने सांगितलं. जेव्हा श्रीदेवींचे निधन झाले तेव्हा खुशी १८ वर्षांची होती. आई यापुढे आयुष्यात नसेल ही वास्तविकता स्वीकारण्यास थोडा वेळ लागला, असा खुलासा खुशीने केला. “ते स्वीकारायला मला थोडा वेळ लागला. मला असं वाटतं की थोड्या वेळाने ते अचानक मला खूप जाणवलं. कदाचित मी थोडे गोंधळलो होते. पण माझ्याकडे जान्हवी होती, माझे बाबा होते त्यामुळे ते मला मदत करण्यासाठी तिथे होते,” असं खुशीने सांगितलं.

जान्हवी कपूरने भर कार्यक्रमात घेतलं बॉयफ्रेंडचं नाव, ‘अशी’ होती बहिणीची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करणने श्रीदेवींनी एका जुन्या मुलाखतीत आपल्या मुलींबद्दल केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. जान्हवीपेक्षा खुशी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी भावनिकदृष्ट्या जास्त परिपक्व होती, असं श्रीदेवी म्हणाल्या होत्या. “आई गेल्यापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, आम्हा बहिणींचं नातं बदललं आहे. ती कधी कधी माझे बाळ आणि माझी आई असते आणि काही वेळा मी तिचं बाळ आणि ती आईसारखी वागते,” असं जान्हवीने सांगितलं.