बॉलिवूडमधल्या बहिणींच्या लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या या दोन्ही मुली इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये यशस्वीरित्या पदार्पण केले. तर आता खुशी कपूरदेखील इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. अशा परिस्थितीत जान्हवीने लहान बहिणीलाही सल्ला दिला. काम करताना कोणती गोष्ट अजिबात काय करू नये, हे तिने खुशीला कारणासहित सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘भेडिया’चा ट्रेलर प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’वर पुन्हा एकदा साधला नेटकऱ्यांनी निशाणा, म्हणाले…

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचा ‘मिली’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत जान्हवी कपूरने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ती सिनिअर या नात्याने ती तिची लहान बहीण खुशी कपूरला एक महत्वाचा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे तर त्याचे कारणही सांगितले आहे.

जान्हवी कपूरला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, मोठी बहीण या नात्याने ती खुशी कपूरला काय सल्ला देऊ इच्छिते? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, “खुशीला मी असा सल्ला देईन की तिने कधीही कोणत्याही अभिनेत्याला डेट करू नये.” हे सांगताना याचे कारणही जान्हवीने दिले. ती म्हणाली, “मला वाटते की माझ्या आणि खुशीसारख्या मुलींनी ते करू नये आणि हेच जास्त चांगले होईल.”

हेही वाचा : श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात होणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी केली महत्वाची विधाने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१८ मध्ये जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर आता खुशी कपूरही पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मधून ती तिच्या बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात करणार आहे. खुशीबरोबरच या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चनची नातू अगस्त्य नंदादेखील झळकणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे