अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला जगभरातील निमंत्रित पाहुण्यांनी हजेरी लावली. बॉलीवूड व दाक्षिणात्य सेलिब्रिटी, सुप्रसिद्ध गायक, राजकीय नेते मंडळी आणि अनेक उद्योगपती या सोहळ्यात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही आले होते.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी सुशीलकुमार शिंदे जामनगरला आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी उज्वला शिंदेही होत्या. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे याच कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियाने गर्लफ्रेंड जान्हवी कपूरसह हजेरी लावली होती.

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, “इतक्या वर्षांनी हिचं…”

अनंत अंबानी यांचा प्री वेडिंग सोहळा खूप चांगला होता. इथे येऊन आनंद झाला, असं सुशीलकुमार शिंदे जामनगरमधून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांचा व्हिडीओ ‘फिल्मी मीडिया’ने शेअर केला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासह जान्हवीची अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी, बॉयफ्रेंडच्या भावासह केला डान्स, पाहा Photos

दरम्यान, शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे आणि जावई संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. शिखरला वीर नावाचा लहान भाऊ असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवी कपूरने या सोहळ्यातील फोटो शेअर केले होते. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बॉयफ्रेंड शिखरसह काही मित्रांबरोबर पोज देताना दिसली. तर, तिने शिखरचा भाऊ वीरबरोबर अनंत अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये डान्सही केला होता.