बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच चर्चेत असते. नुकतंच जान्हवीने चेन्नई येथील श्रीदेवी यांनी खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याला भेट दिली. जान्हवीने बंगल्याची सफर व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना घडवली आहे. यावेळी जान्हवीने आई श्रीदेवी यांच्याबद्दलच्या आठवणीही शेअर केल्या.

जान्हवी म्हणाली, “माझ्या आईसाठी हा बंगला खरेदी करणं फार कठीण होतं. तिच्या लग्नानंतर तिला हा बंगला डेकोरेट करायचा होता. जगभरातील ज्या ठिकाणांना तिने भेटी दिल्या. त्या ठिकांणाहून आणलेल्या वस्तूंनी तिला हा बंगला सजवायचा होता”. जान्हवीने वोग इंडियासह बनविलेल्या या व्हिडीओमध्ये श्रीदेवींबरोबरची तिची आठवण सांगताना वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलासा केला.

हेही वाचा >> शिव ठाकरे-वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ते’ फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा…”

हेही वाचा >> तमन्ना भाटिया व्यावसायिकाबरोबर थाटणार संसार? फोटो शेअर करत म्हणाली…

“बंगल्यातील माझ्या बेडरुममधील बाथरुमला अजून लॉक नाही आहे. कारण आई मला कधीच बाथरुमचा दार बंद करुन द्यायची नाही. मी बाथरुममध्ये जाऊन मुलांबरोबर बोलेन अशी तिला भीती वाटायची. बंगल्यातील माझ्या रुममध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही रुममधील बाथरुमला लॉक लावलेलं नाही”, असं जान्हवी म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तिच्या आगामी बवाल चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट २०२३च्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.