आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री म्हणजेच जान्हवी कपूर. जान्हवीनं तिच्या करिअरची सुरुवात ‘धडक’ या चित्रपटापासून केली. मग ‘गुंजन सक्सेना – द कारगिल वॉर’, ‘गुड लक जेरी’, ‘मिली’ असे हिट चित्रपट देत तिनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. त्यादरम्यान जान्हवीनं दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.

बॉलीवूड कलाकारांचे अनेक क्षण पापाराझी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते कॅप्चर करण्याच्या प्रयत्नात असतात. सेलिब्रिटींनुसार पापाराझी त्यांचे फोटो काढतात, असं जान्हवी म्हणालीय. जान्हवीनं असंदेखील उघड केलं की, सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेनुसार, पापाराझींना त्या कलाकाराच्या प्रत्येक फोटोसाठी पैसे दिले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीनं या सगळ्याबद्दल भाष्य केलं आहे.

Alia Bhatt launches children book get gifts for raha kapoor
Video: …आणि आलिया भट्ट आता बनली लेखिका, राहा कपूरसाठी चिमुकल्यांनी आईजवळ दिले गिफ्ट्स, व्हिडीओ व्हायरल
swara bhasker slams food blogger
शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या ब्लॉगरवर स्वरा भास्कर भडकली; म्हणाली, “गायींचं दूध चोरून…”
Shatrughan Sinha did not want Sonakshi to get married
सोनाक्षीने लग्न करू नये, असं शत्रुघ्न सिन्हांना वाटायचं; अभिनेत्रीने स्वतः केलेला खुलासा, म्हणाली, “कधीकधी माझी आई…”
mandira bedi talks about adopted daughter
“कधीही कारमध्ये न बसलेल्या मुलीने थेट प्रायव्हेट जेटने…”, दत्तक मुलीबद्दल काय म्हणाली मंदिरा बेदी?
Sonakshi Sinha meets Zaheer Iqbal family ahead of wedding
सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo
Prajakta Koli dance on Mashup Pushpa 2 Song Angaron And Aali Naar Thumkat Murdat Song
Video: ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याच्या मॅशअपवर मराठमोळ्या प्राजक्ता कोळीचा जबरदस्त डान्स, श्रीवल्लीने केलं कौतुक
genelia deshmukh write special post for riteish deshmukh
“रियान आणि राहिलचे बाबा…”, ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाची खास पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला, “बायको तुझ्याशिवाय…”
Riteish Deshmukh genelia shared funny video on social media went viral
VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…
On fathers day Varun dhawan shared photo with her daughter on social media
Fathers Day: नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो, म्हणाला, “मुलीचा बाबा…”

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आता ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ प्रमोशन सुरू आहे म्हणून मी आता विमानतळावर असेन, तर त्यांना माझे फोटो काढण्यासाठी बोलावलं जातं. पण, जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसतं आणि जेव्हा माझं कोणतंही शूट सुरू नसतं आणि मला जेव्हा माझा असा स्वत:चा वेळ हवा असतो तेव्हा ते अधिक मेहनत घेतात आणि असं बहुतेक वेळा झालंय. ते माझ्या कारचा पाठलाग करतात. कारण- त्यांना प्रत्येक फोटोसाठी पैसे मिळतात.”

जान्हवी पुढे म्हणाली, “प्रत्येक सेलिब्रिटीचं एक रेशन कार्ड आहे. त्यांचे फोटो या या किमतीला विकले जातात. जर तुमची किंमत जास्त असेल, तर ते कसंही करून तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यासाठी तुमच्या कारचाही पाठलाग करतात.आणि जर किंमत जास्त नसेल, तर तुम्हाला पापाराझींना कॉल करून बोलवावं लागतं.”

हेही वाचा… “माझी जीभ काळी आहे”; फराह खान तिच्याशी वाईट वागणाऱ्यांना देते शाप; म्हणाली, “त्यांचे २-३ चित्रपट फ्लॉप…”

दरम्यान, जान्हवीचा ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ हा चित्रपट ३१ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवीबरोबर राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच जरीना वहाब, कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही निर्णायक भूमिका यात आहेत.

जान्हवीच्या कामाबाद्दल सांगायचं झालं, तर ‘उलझ’, ‘देवरा’ तसंच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे.