बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या शिखर पहाडियाबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरने पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी शिखर आणि जान्हवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. या पार्टीतील एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्याला मॅचिंग कलरचा ओव्हरकोट घातला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तर शिखर चमकदार जॅकेटमध्ये झळकत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, त्याने जान्हवी कपूर कपूरला डेट केले आहे. मात्र, काही काळानंतर दोघे वेगळे झाले. करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये दोघांमधील नात्याची पुष्टी केली होती. याआधीही जान्हवी कपूर आणि शिखर मुंबईत बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत.

आणखी वाचा : संसदेच्या आवारात कंगना राणौतच्या चित्रपटाचे चित्रीकरण होणार? ‘इमर्जन्सी’बद्दल मोठी अपडेट

संजय पहाडिया आणि स्मृति शिंदे यांच्यापोटी जन्मलेला शिखर हा उद्योगपती आहेच शिवाय तो एक उत्तम पोलो प्लेयर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताचं नेतृत्त्वदेखील केलं आहे. रीजेंट युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ग्लोबल फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये त्याने शिक्षण घेतलं आहे. शिवाय लंडनस्थित ‘वाधवान ग्लोबल कॅपिटल लिमिटेड’मध्ये गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम सुरू केलं. याबरोबरच त्याने भारतातील ‘एंड्रोमेडा फायनान्शियल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’मध्ये काम केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते. तथापि, श्रीदेवीच्या ‘नो डेटींग क्लॉज’मुळे जान्हवी तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करू शकली म्हणून या दोघांना तेव्हा वेगळं व्हावं लागलं. आता व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता हे दोघे पुन्हा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होत आहे. जान्हवी कपूर नुकतीच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. याशिवाय ती गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाची निर्मिती जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी केली होती.