Javed Akhtar Bought Bungalow In 1970s: चित्रपट लोकप्रिय ठरण्यासाठी फक्त कलाकारांचा अभिनयच नाही तर पटकथा आणि त्याची मांडणी, शूटिंगची गुणवत्ता, गाणी यामुळे सिनेमे गाजतात; त्यामुळे एखादा चित्रपट लोकप्रिय ठरण्यासाठी असे अनेक घटक महत्त्वाचे ठरतात.
लोकप्रिय गीतरचनाकार व पटकथा लेखक अशी जावेद अख्तर यांची ओळख आहे. जावेद अख्तर त्यांच्या बॉलीवूडमधील योगदानासाठी ओळखले जातात. तितकेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुंबईतील बंगल्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी त्यांचा बंगला किती रुपयांना विकत घेतला होता, याचा खुलासा केला आहे.
जावेद अख्तर यांनी ७० च्या दशकात फक्त ‘इतक्या’ रुपयांना मुंबईत खरेदी केलेला बंगला
जावेद अख्तर यांनी नुकतीच मिड-डेला मुलाखत दिली. या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी खुलासा केला की, १९७० च्या दशकात वांद्रे बँडस्टँड येथे ४००० चौरस फूट क्षेत्रफळाचा बंगला त्यांनी पाच लाख रुपयांना घेतला होता.
जावेद अख्तर यांना विचारण्यात आले की, तुम्ही मुंबईत बंगला घेणारे पहिले व्यक्ती आहात का? यावर जावेद अख्तर म्हणाले, “मला माहीत नाही, मला त्याबद्दल कल्पना नाही, मला सगळ्यांच्या घरी जाऊन विचारावे लागेल.” जावेद अख्तर यांनी पुढे दावा केला की, त्यांचे मित्र गुलजार यांचा पाली हिल येथे बंगला होता. त्यांची पत्नी राखी गुलजार बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री होती.
पुढे जावेद अख्तर म्हणाले की, त्या काळात मोठ्या प्रमाणात मुंबईत बंगले नव्हते. पण, साहिरला बंगला पाहिजे होता. कालातरांने त्याने बिल्डिंग बांधली. जुहूमध्ये बांधलेल्या या इमारतीत दोन मजले होते. चित्रपटांतील गाण्यांसाठी त्याला ही जमीन मिस्टर बीआर चोप्रा यांनी दिली होती. त्यावेळी जमिनीच्या किमती कमी होत्या. त्या जमिनीवर करीम भाई नाडियाडवाला यांनी दुसऱ्या एका चित्रपटाच्या मोबदल्यात साहिरला ती इमारत बांधून दिली होती. साहीर बंगला बांधू शकला असता, पण त्याने बंगला बांधला नाही.
बलराज साहनी यांनीदेखील त्यांच्या मानधनाच्या बदल्यात बंगला बांधून घेतला होता. जावेद अख्तर म्हणाले, “तो बंगला सध्या वाईट स्थितीत आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला वाईट वाटते.” बलराज साहनी हे त्यांच्या मुलीच्या अचानक झालेल्या निधनानंतर नैराश्यात गेले होते. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांचे एका वर्षात निधन झाले.
सध्या जावेद अख्तर यांची महाराष्ट्रात तीन ठिकाणी मालमत्ता आहे. वांद्रे बँडस्टँड येथे त्यांचा बंगला आहे. तसेच जुहू येथे सी-फेस बंगला आहे आणि खंडाळा येथे फार्महाऊस आहे. दरम्यान, आजही जावेद-सलीम यांच्या जोडीचे कौतुक होते. त्यांनी जंजीर, दीवार, शोले अशा गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत.