गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर सातत्याने चर्चेत आहेत पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर केलेलं भाष्य हे तिथं उपस्थित पाकिस्तानी लोकांचा चांगलीच चपराक होती. त्यांच्या या वक्तव्याचं भारतीयांकडून खूप कौतुक केलं जात आहे. अशातच भारतात परतलेल्या जावेद अख्तर यांनी या पार्श्वभूमिवर ‘एबीपी न्यूज’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारतात सुरू असलेल्या हिंदू राष्ट्र संकल्पनेवरून टीका केली.

वेगळ्या पाकिस्तानची निर्मिती करणं चूक होती का? अलीकडेच लाहोरहून परतलेले जावेद अख्तर म्हणतात…

कोणत्याही देशाची निर्मिती धर्माच्या आधारावर होऊच शकत नाही, असं स्पष्ट मत यावेळी जावेद अख्तर यांनी मांडलं. पाकिस्तानची धर्माच्या आधारे फाळणी झाल्यानंतर त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या अवस्थेचा उल्लेख करत जावेद अख्तर म्हणाले, आपण तीच चूक करत आहोत, जी पाकिस्तानने ७० वर्षांपूर्वी केली होती. आता तुम्हालाही हिंदू राष्ट्र हवं आहे. अरे इतक्या वर्षांत ते नाही बनवू शकले, जग नाही बनवू शकलं, तर तुम्ही काय हिंदू राष्ट्र बनवणार आहात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण काय चूक करतोय, ते आपल्या लक्षातच येत नाहीये, असं ते म्हणाले.

“तू अमानुष आहेस” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांचा रस्त्यावरील व्हिडीओ पाहून संतापला अभिनेता; म्हणाला, “जर तुझी मुलं…”

“आपल्या देशात काही लोक आहेत, ज्यांना संविधान मान्य नाही. संविधान खऱ्या भारताचं प्रतिनिधीत्व करत नाही, असं त्यांना वाटतं, याबद्दल ते जाहीरपणे लिहतात व बोलत असतात. भारताला काही वर्षांमध्ये हिंदू राष्ट्र बनवायचंच, अशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये येत असतात. मला हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हेच माहीत नाही. धर्माच्या आधारावर बनलेला देश कसा असतो. ज्यांनी बनवला आहे, त्यांना पाहून घ्या,” असं म्हणत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष टोला लगावला.