शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. ‘पठाण’ प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटावरुन बराच वाद रंगला. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाणं चर्चेचा विषय ठरलं. या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी चर्चेत आली. मात्र या वादाचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

दरम्यान ‘पठाण’ चित्रपटाची सगळीकडेच चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे एका चित्रपटगृहामधील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पठाण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली तुफान गर्दी दिसत आहे.

‘पठाण’बाबत काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

चित्रपटगृहामधील गर्दीचा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “‘पठाण’ पाहणारे कुठल्या जाती धर्माचे आहेत हे कळतंय का? हा माझा भारत आहे. प्रेमाच्या धाग्यांनी विणलेला. द्वेशाची तलवार चालवली तरी वीण सैल ही होत नाही तुटणे तर लांबचे. मी भारतीय आहे. कृपया सर्टिफिकेट विचारू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंटद्वारे आपलं मत मांडलं आहे. सध्या ‘पठाण’ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे दीपिका व जॉन अब्राहमच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.