बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकतंच ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तिच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. पण आता कंगना रणौत चर्चेत आहे ते तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. नेहमीच बिनधास्तपणे आपली मतं मांडणाऱ्या कंगनाने आता पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना खडे बोल सुनावले आहेत.

कंगना रणौतने कोणत्याही बॉलिवूड कलाकाराचं नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांना भिकारी माफिया म्हटलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “भिकारी फिल्म माफियांना माझा अॅटीट्यूड म्हणजे गर्विष्ठपणा वाटतो. कारण मी दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे त्यांच्यासमोर हात पसरत नाही. मी असं करण्यास नकार देते.”

आणखी वाचा- आईच्या साधेपणाबद्दल भाष्य करणारी कंगना रणौतची खास पोस्ट; फिल्म माफियालाही सुनावले खडेबोल

याच ट्वीटमध्ये कंगना पुढे लिहिते, “कामासाठी चित्रपटांमध्ये आयटम नंबर करणं, लग्नांमध्ये डान्स करणं आणि रात्री बोलवल्यानंतर अभिनेत्यांच्या रुममध्ये जाणं. या सर्व गोष्टींना मी स्पष्ट शब्दांत नकार दिला. तर त्यांनी मी वेडी असल्याचं घोषित केलं. मला तुरुंगात पाठवण्याचाही प्रयत्न केला. हा गर्विष्ठपणा आहे की प्रामाणिकपणा.”

आणखी वाचा- Video: भर कार्यक्रमात अचानक आलिया शोधू लागली सॅमसंगचा फोन, पाहा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कंगना रणौतच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या तुफान प्रतिक्रिया आल्या आहेत. या ट्वीटमधून तिने बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकरांना खडे बोल सुनावल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार दिल्लीतील एका लग्नात सहभागी झाले होते आणि या लग्नात त्यांनी डान्सही केला होता ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.