scorecardresearch

Video: …अन् पडता पडता वाचली न्यासा देवगण; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “इतकी दारू…”

न्यासा देवगणचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, ट्रोलही झाली अजय-काजोलची लेक

Video: …अन् पडता पडता वाचली न्यासा देवगण; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “इतकी दारू…”
(फोटो- व्हिडीओतून स्क्रीनशॉट

अभिनेता अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा ही सोशल मीडियावर चर्चेत असते. न्यासा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. न्यासाचे लाखो फॉलोअर्स आहेत, त्यामुळे ती शहरात कुठे गेली असेल, तिथलेही तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या न्यासाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत ती धडपडताना दिसत आहे.

न्यासा मुंबईतील जुहू भागात एका सलूनमधून बाहेर येताना दिसली. यावेळी न्यासाने हॉट पिंक कलरचा क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स घातली होती. या लूकमध्ये अजय देवगणची लेक खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने मास्कही लावलं होतं. ती सलूनमधून बाहेर पडली आणि कारजवळ जायला निघाली. पण गेटमधून बाहेर पडताच तिला ठेच लागली आणि ती पडता पडता वाचली. न्यायाचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड नावाच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.


दरम्यान, तिच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत. ‘मुंबईच्या रस्त्यांपासून कुणाची सुटका नाही’, ‘इतकी दारू का पिता की तुम्हाला धड चालता येत नाही’, ‘न्यासा पण तिच्या आई काजोलसारखी आहे, काजोलही बऱ्याचदा धडपडत असते’, ‘ती खरंच पडता पडता वाचली की तिच्या चालण्याची स्टाईलच अशी आहे’, ‘न्यासा पडता पडता वाचली’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

“त्या मालिकेच्या सेटवर मला…” सिने असोसिएशनच्या अध्यक्षांनी वर्तवला संशय; तुनिषाच्या आत्महत्येच्या SIT चौकशीची मागणी

दरम्यान, न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही खूप चर्चा होत असतात. पण ती सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे. इतक्यात तरी तिचा बॉलिवूडमध्ये यायचा कोणताही विचार नसल्याचं अनेकदा काजल आणि अजयने स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 08:29 IST

संबंधित बातम्या