Kajol and Rani Mukerji gets emotional: संपूर्ण देशभरात सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर विविध ठिकाणचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

राणी मुखर्जी व काजोल का झाल्या भावुक?

या सगळ्यात काजोल व राणी मुखर्जी या दोन बॉलीवूड अभिनेत्रींनी लक्ष वेधून घेत आहे. दोन्ही अभिनेत्री दरवर्षी मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा करताना दिसतात. या वर्षीसुद्धा काजोल आणि राणी मुखर्जी नवरात्र उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. दोन्ही अभिनेत्री पारंपारिक वेशभूषेत तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुर्गा पूजेत मुखर्जी कुटुंब भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याचे कारण म्हणजे काजोलचे काका देब मुखर्जी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते दरवर्षी या उत्सवात सहभागी होत असत. त्यांच्या आठवणीत अभिनेत्री भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

देब मुखर्जींच्या आठवणीत काजोल, रानी व तनिषा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना पाहून अयान मुखर्जीदेखील भावूक झाला. या भावंडांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये राणी व काजोल दुर्गामातेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत असल्याचे पाहायला मिळाले. दोघींनी देवीच्या मूर्तीवर फुलांचा वर्षावदेखील केला. या पूजेदरम्यान राणीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. तर काजोलने सोनेरी रंगाची साडी नेसल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या साध्या लूकने सर्वांची मने जिंकली. तसेच, नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, या दुर्गा पूजेत शरबानी मुखर्जी व सुमोना चक्रवर्तीदेखील दिसल्या. दोघी काजोलच्या बहिणी आहेत. राणी मुखर्जीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर, काजोल सध्या टू मच विथ काजोल व ट्विंकल या शोमध्ये दिसत आहे.