बॉलीवूड क्वीन कंगना रणौत सध्या जावेद अख्तर यांच्याबरोबरच्या जुन्या वादांमुळे चर्चेत आहे. २०२० मध्ये अभिनेत्रीने त्यांच्यावर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ३ मे रोजी सुनावणी झाली. ज्यामध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाने केलेल्या आरोपांचा निषेध केला. दरम्यान, आता कंगनाची एक जुनी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.

हेही वाचा- ‘मैं अटल हूं’ पंकज त्रिपाठींनी साकारला हुबेहूब लुक! व्हिडीओ शेअर करत सांगितले अटलजींचे विचार

कंगना रणौतने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ‘यंग स्टार’ म्हणण्यावर प्रश्न उपस्थित केला होता. कंगना म्हणाली होती, ‘त्यांना तरुण म्हणण्यात अर्थ काय आहे? रणबीर कपूर ३७ वर्षांचा झाला असून त्याला या पिढीतील तरुण मुलगा म्हटले जाते आणि आलिया भट्ट २७ वर्षांची होत आहे. या वयात माझ्या आईला तीन मुले झाली. असं कंगना म्हणाली होती.

कंगनाने ‘मिड डे’शी संवाद साधला होता आणि या मुलाखतीदरम्यान तिने रणबीर आणि आलियाला टार्गेट करण्याची एकही संधी सोडली नाही. कंगना म्हणाली, ‘आजच्या पिढ्यांना काय झाले माहीत नाही. आयुष्यावर बोलायचे म्हटले तर ते पटकन बोलतील, पण देशाच्या प्रश्नांवर बोलायचे असेल तर ते म्हणतील, ही आमची वैयक्तिक निवड आहे.

हेही वाचा- ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!

जावेद अख्तर आणि कंगनामध्ये नेमका काय आहे वाद?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण खूप गाजले होते. याच दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. तिने, जावेद अख्तर तिला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा आरोप केला होता. आता तीन वर्षांनी ३ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली, ज्यात कंगनाचे विधान अपमानास्पद होते, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.