अनेकजण मोठी स्वप्नं उराशी बाळगून मायानगरी मुंबईत येतात. चित्रपटांमध्ये काम करून यशस्वी व्हायचं, प्रसिद्धी मिळवायची असं अनेकांना वाटतं. पण यश प्रत्येकाला मिळतं असं नाही. अशा हजारो लोकांपैकी बोटावर मोजण्याइतक्या काहींना यश मिळतं तर बाकीचे या ग्लॅमर इंडस्ट्रीत पोहोचू शकत नाही. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार कमी कालावधीत गायब होतात, काही माघारी घरी परतात, तर काही चुकीच्या कामात अडकतात. काहींबरोबर तर घातपात झाले. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचा तिच्याच घरात खून झाला होता.

कंगना रणौतसह ‘रज्जो’ चित्रपटात काम केलेल्या कृतिका चौधरीचा खून झाला होता. तिच्या मित्रांनीच तिची हत्या केली होती. २०१७ मध्ये कृतिकाचा खून झाला आणि तिचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या लोकांशी कृतिकाची ओळख होती आणि त्यांनीच तिचा खून केला होता.

“मी चांगली बहीण होऊ शकले नाही,” रत्ना पाठक यांची कबुली; सुप्रियांचा उल्लेख करत म्हणाल्या, “मानसिक त्रास…”

एसी चालू असल्याने चार दिवस कुणालाच कळालं नाही

कृतिका मुंबईतील एका घरात एकटीच राहायची. तिचा खून कट रचून करण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. कृतिकाचा खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी घराचा एसी चालू केला होता, जेणेकरून मृतदेह कुजला तरी घरातून दुर्गंधी बाहेर जाऊ नये. त्याच एका कारणाने चार दिवस कृतिकाचा मृतदेह घरात पडला होता, पण कुणालाच कळालं नाही. चार दिवस ती घराबाहेर पडली नव्हती आणि घराबाहेर दुर्गंधी पसरल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला आणि आत पाहिलं असता कृतिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर

कृतिकाचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच कळलं नाही. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आसपासच्या लोकांची चौकशी करण्यात आली. ज्याच्या आधारे दोन जणांना अटक करण्यात आली, त्यापैकी एकाचं नाव शकील नसीम आणि दुसऱ्याचं नाव वासुदास होतं.

नसीरुद्दीन शाहांच्या कुटुंबाने कधीच धर्मांतर करण्यास सांगितलं नाही; आंतरधर्मीय लग्नाबाबत रत्ना पाठक यांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा हजार रुपयांवरून झाला होता वाद

या दोघांची चौकशी केल्यावर त्यांनीच कृतिकाची हत्या केल्याचं मान्य केलं होतं. आधी त्यांनी कृतिकाबरोबर बसून जेवण केलं आणि त्यानंतर सहा हजार रुपयांवरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की त्यातील एकाने कृतिकावर हल्ला केला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हातावर लोखंडी पंजा घालून कृतिकावर हल्ला केला होता, असं म्हटलं जातं.