लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. ती सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपाची उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. ती मंडी मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहे व रॅलीमध्ये भाषणं देत आहे. आता एका निवडणूक रॅलीतील तिच्या भाषणाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या भाषणात तिने स्वतःची तुलना बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी केली.

“संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला आहे की मी राजस्थानला जावो, पश्चिम बंगालला जावो, दिल्लीला जावो किंवा मणिपूरला, लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात, इतका आदर करतात. मी दाव्याने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत इतकं प्रेम व आदर जर कुणाला मिळत असेल तर ती फक्त मी आहे,” असं कंगना रणौत प्रचाराच्या भाषणात म्हणाली.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos

कंगना रणौतचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी तिच्या फ्लॉप चित्रपटांचा उल्लेख करत तिला ट्रोल करत आहेत. “कंगनाचा शेवटचा हिट चित्रपट २०१५ मध्ये आला होता आणि त्यानंतर तिने बॅक टू बॅक १५ फ्लॉप चित्रपट दिले आणि इथे ती स्वत:ची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी करत आहे”, अशा शब्दांत कंगनाची खिल्ली उडवत एका व्हेरिफाईड पॅरोडी अकाउंटने तिचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

मंडी लोकसभा मतदारसंघासाठी १ जूनला मतदान होणार आहे. हे शेवटच्या, सातव्या टप्प्यातील मतदान होईल. २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपाचे राम स्वरुप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती व ते विजयी झाले होते. पण २०२१ मध्ये त्यांच्या निधनानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजयी झाल्या होत्या.

“मी सर्व धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकल्या होत्या…”, शेखर सुमन यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाले, “ज्या देवाने मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगना रणौत मुळची हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील आहे. याच ठिकाणाहून तिला भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलं आहे. याठिकाणी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कंगना रणौत मतदारसंघात फिरून प्रचारसभा घेत आहे. या निवडणुकीत कंगना रणौतला मतदार स्वीकारणार की नाही ते निकालांची घोषणा झाल्यावरच कळेल.