बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘तेजस’ उद्या २७ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंगना या चित्रपटात ‘तेजस गिल’ या भारतीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटात प्रेक्षकांना तिचा अॅक्शन अवतारही पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा- लाईव्ह शोमध्ये चाहत्याने पैसे उधळले अन् आतिफ अस्लमने कार्यक्रम थांबवला; गायक म्हणाला, “मित्रा…”

आता ओरमॅक्सने चित्रपटाच्या कमाईबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. ओरमेक्सच्या मते, ‘तेजस’ चित्रपट पहिल्या दिवशी १.३ कोटी रुपयांची कमाई करु शकतो. या चित्रपटाद्वारे कंगना एका वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. कंगनाने गेल्या ४ वर्षात बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. कंगनाला या चित्रपटाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे तेजस कंगनाच्या फ्लॉप करिअरला वाचवू शकेल का हे पाहणं महत्वाचं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजस चित्रपटाची कथा एका भारतीय गुप्तहेराला दहशतवादींच्या तावडीतून सोडवण्याच्या एका मिशनवर आधारीत आहे. हा भारताचा पाहिलं एरियल अॅक्शन चित्रपट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केलं आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र, करोनामुळे आणि व्हीएफएक्सच्या काही कामामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला होता.