कंगना राणौतचा नवा चित्रपट तेजस २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ना चांगला प्रतिसाद मिळाला ना चित्रपटाने चांगली कमाई केली. ‘तेजस’ने पहिल्याच दिवशी देशभरात केवळ १.२५ कोटींची कमाई केली. पण कंगनाच्या आधीच्या ‘धाकड’ या चित्रपटापेक्षा ‘तेजस’ कैक पटीने चांगला असल्याचं कित्येकांनी सांगितलं आहे. ‘धाकड’ने तर बॉक्स ऑफिसवर केवळ ५५ लाखांची कमाई केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच आता कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत लोकांना हा चित्रपट पाहण्याचे आव्हान केले आहे. प्रेक्षकांना केलेली ही विनंती कंगनाला चांगलीच महागात पडली आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. कंगनाची जुनी वक्तव्य आणि ट्वीट लोकांनी शोधून शेअर करायला सुरुवात केली आहे यामुळे अभिनेत्री पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

आणखी वाचा : लोकांना खळखळून हसवणाऱ्या ‘चँडलर’चं आयुष्य दारू व ड्रग्सपायी झालेलं उद्ध्वस्त; अभिनेत्यानेच केलेला खुलासा

कंगना आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाली, “नमस्कार मित्रांनो. काल आमचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते खूप कौतुक करत आहेत. पण मित्रांनो, कोविडनंतर आपली हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे सावरलेली नाही. प्रेक्षक ९९ टक्के चित्रपटांना संधीसुद्धा देत ​​नाहीत. मला माहित आहे की या आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे. घरात टीव्ही आहे.”

पुढे कंगना म्हणते, “सुरुवातीपासूनच थिएटर हा आपल्या सभ्यतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर, माझी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की, जर तुम्ही याआधी ‘उरी’, ‘मेरी कॉम’ आणि ‘नीरजा’ सारख्या चित्रपटांचा आस्वाद घेतला असेल तर तुम्हाला ‘तेजस’ देखील खूप आवडेल. जय हिंद.” कंगनाच्या या व्हिडीओवर लोकांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘पठाण’, ‘जवान’, ‘गदर २’, ओएमजी २’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ अशा कित्येक चित्रपटांची नावं नेटकऱ्यांनी कंगनाच्या लक्षात आणून दिली आहेत.

इतकंच नव्हे तर एका नेटकाऱ्याने लिहिलं, “बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड चलवणाऱ्या लोकांना स्वतःचा चित्रपट लोकांनी पहावा अशी विनंती करावी लागत आहे, फार वाईट आहे हे.” कोविडदरम्यान कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयकॉट गँगला चांगलाच पाठिंबा दिला होता, याबरोबरच तिने बॉलिवूडचे चित्रपट बॉयकॉट केले पाहिजेत असं वक्तव्यंही तिने केलं होतं. आता ‘तेजस’साठी कंगनाने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे लोकांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut request audience to watch her film tejas people started digging her old tweets avn
First published on: 29-10-2023 at 17:01 IST