बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेचा विषय असतो. कधी तो त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमुळे, तर कधी त्याच्या नव्या सिनेमांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. मात्र, नुकताच करणचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खूप अशक्त आणि थकलेला दिसत असल्याने त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हा फोटो कॉमेडियन हर्ष गुज्जरालने शेअर केला असून, नेटकऱ्यांनी करण जोहरच्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी त्याला आजारी आणि खूप बारीक दिसत असल्याचं म्हटलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा…आराध्याच्या जन्मावेळी ऐश्वर्याने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ‘बिग बीं’ना वाटला होता अभिमान, सुनेचं कौतुक करत म्हणाले होते…

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

एक्स माध्यमावर हा फोटो पोस्ट करत एका युजरने लिहिलं, “करण जोहर खूप आजारी दिसतोय, मला खरंच त्याची काळजी वाटते. अनेकांच्या नकारात्मकता आणि मत्सराने त्याच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला आहे. आलियाला नंबर वन स्टार बनवायच्या प्रयत्नात त्याला फक्त टीका आणि नकारात्मकता मिळाली आहे.”

आणखी एका युजरने लिहिलं, “माणूस खूप आजारी दिसतोय, आशा आहे की तो ठीक असेल.” अशा आशयाची कमेंट केली आहे.

हेही वाचा…मुंबईत येऊन झालेले दोनच दिवस; ‘हे’ खलनायक थेट गेले सुनील दत्त यांच्या घरी, खुद्द नर्गिस यांनी वाढलं जेवण; अनुभव सांगत म्हणाले…

करण जोहरच्या नव्या प्रोजेक्टची तयारी

करण जोहर सध्या विविध माध्यमांचा वापर करून प्रेक्षकांसमोर सिनेमा सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक भव्य बजेटची वेब सीरिज घेऊन येण्याच्या तयारीत आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, करणने या प्रोजेक्टची स्क्रिप्ट फायनल केली असून २०२५ च्या सुरुवातीला शूटिंग सुरू होणार आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

करणवर घराणेशाहीचा आरोप

या महिन्याच्या सुरुवातीला दिग्दर्शक वासन बाला यांच्या एका मुलाखतीतील एक क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये वासन यांनी उल्लेख केला की करणने आलियाला त्याच्या स्क्रिप्टची अपूर्ण आवृत्ती पाठवली होती. वासन यांनी विनोदाने सांगितले की, जर त्यांना माहीत असतं की ही स्क्रिप्ट आलियाकडे जाणार आहे, तर त्यांनी ती व्यवस्थित फॉरमॅट करून आणि संपादित करून पाठवली असती. वासन बालाच्या या मुलाखतीचा वेगळाच अर्थ घेत सोशल मीडियावर करण जोहरवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा……म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करण जोहरचा सह-निर्मिती असलेला ‘जिगरा’ सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं असून आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.