Karan Johar Says His father Yash Johar Struggled As A Producer : करण जोहर हा दिवंगत निर्माते यश जोहर यांचा मुलगा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत करणनंसुद्धा पुढे जाऊन चित्रपटांचं दिग्दर्शन व निर्मिती केली. परंतु, करण जोहर व त्याच्या वडिलांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जिथे त्यांना आर्थिक संकटाला सामोर जावं लागलं होतं. दिग्दर्शकानं स्वत: याबाबत सांगितलं आहे.

करण जोहरनं एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. त्याचे वडील यश जोहर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांमुळे त्यांच्या कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. करणनं जय शेट्टीला नुकतीच मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यानं याबाबत सांगितलं आहे.

जोहर कुटुंबियांवर आलेलं आर्थिक संकट

करण जोहर म्हणाला, “१९८० रोजी माझ्या वडिलांनी पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती केली होती. त्या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. त्यानंतर त्यांचे सलग चार चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यावेळी बँक किंवा स्टुडिओकडून कुठलाही फंड मिळाला नाही.”

करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ची सुरुवात त्याच्या वडिलांनी १९८० मध्ये केली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका असलेला ‘दोस्ताना’ चित्रपट याच बॅनरखाली प्रदर्शित झाला होता. परंतु, त्यानंतर आलेले ‘दुनिया’, ‘मुकद्दर का फैसला’, ‘अग्निपथ’, ‘ड्युप्लिकेट’ हे चार चित्रपट अपयशी ठरले होते.

करण वडिलांबद्दल पुढे म्हणाला, “त्यांनी घर, दागिने हे सगळं विकलं. माझ्या वडिलांनी त्यांनी खरेदी केलेली जमीनही विकली, आईने तिचे दागिने विकले. कारण- बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरले होते, ज्यामुळे आमचं खूप नुकसान झालं. त्यामुळे जेव्हा आज लोक मला नेपोटिझमवरून बोलतात तेव्हा मला हसू येतं. माझे वडील असते, तर ते खूप हसले असते.”

“आमची निर्मिती संस्था फार मोठी नव्हती. आम्हाला अपयश आलं; पण त्यातून आम्ही पुन्हा नव्यानं उभे राहिलो. कारण- माझे वडील खूप चांगली व्यक्ती होते. चित्रपटसृष्टीतील लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते. करणनं पुढे त्यानं त्याच्या आई-वडिलांना आर्थिक अडचणीतून जाताना पाहिलं आहे. त्याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “मी माझ्या आईला रडताना पाहिलं आहे. मी दोघांनाही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण मी हे सगळं लांबूनच पाहत असे. कारण- त्यांनी याचा त्रास मला होऊ नये म्हणून या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. पण, मी सगळं बघत होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.