बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४२५ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बॉलिवूडवर बॉयकॉटचे संकट आले होते. या चित्रपटामुळे बॉलिवूडच्या विरोधामध्ये असलेली परिस्थिती काहीशी बदलली. ब्रम्हास्त्रच्या प्रदर्शनाला काही दिवसांमध्ये एक महिना पूर्ण होणार असला, तरी अजूनही या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अयान मुखर्जीच्या अस्त्रव्हर्स या काल्पनिक जगातला ‘ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा’ हा पहिला चित्रपट आहे.

हा चित्रपट बनवण्यासाठी अयान मुखर्जीला आठ वर्ष लागली. दरम्यान ‘ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा’चे बजेट ४०० कोटी रुपये आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबद्दल चित्रपटाचा निर्माता करण जोहरने मत मांडले आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने ‘ब्रम्हास्त्र पार्ट १: शिवा’ हा चित्रपट तयार करण्यासाठी ४०० कोटी वापरले नसल्याची माहिती दिली. ‘ब्रह्मास्त्रच्या तीन चित्रपटांची मालिका तयार करण्यासाठी इतकी रक्कम खर्च होणार आहे’ असे सांगत त्याने अफवांवर विश्वास ठेवू नये ही विनंती केली.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूडविषयी गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीदरम्यान म्हणाला, “मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण जेव्हा या क्षेत्रामध्ये माझ्यासह काम करणारे/केलेले लोक कारण नसताना वाईट वागतात, तेव्हा मला फार दु:ख होतं. तुम्ही टीका करु शकता, पण नकारात्मक असणं चूकीचं आहे. या लोकांचा सूर सकारात्मक टीकेकडून नकारात्मक विचारांकडे सतत वळतो. आपण एकाच क्षेत्रामध्ये आहोत, तर तुम्हाला हा (ब्रम्हास्त्र) चित्रपट चालू नये असे का वाटते? हेच लोक पुन्हा माध्यमांचे प्रतिनिधित्व करत चित्रपटाला मिळालेले अपयश साजरा करतात. माझ्या मते, ही अत्यंत चुकीची बाब आहे”

आणखी वाचा – Bigg Boss 16 : सलमान खानची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री, स्पर्धकांची घेणार शाळा, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रम्हास्त्रच्या चित्रपट मालिकेतील दुसरा चित्रपट ‘ब्रम्हास्त्र पार्ट २ देव’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहरुख खानच्या पात्राला मध्यवर्ती ठेवून अयान मुखर्जी चित्रपट तयार करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.