अभिनेत्री करीना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे पालक आता एकत्र राहू लागले आहेत. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर व एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या बबिता यांच्यातील दुरावा आता संपला आहे. प्रेमविवाह करणारे रणधीर व बबिता घटस्फोट न घेता मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. पण आता मात्र दोघेही एकत्र आले आहेत.

“मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढलं” पत्नीच्या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीचं प्रत्युत्तर; म्हणाला, “तिने मुंबईतील फ्लॅट…”

रणधीर व बबिता यांनी १९७१ मध्ये लग्न केलं होतं आणि नंतर १९८८ मध्ये ते वेगळे झाले होते. आता तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले आहेत. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. आता पुन्हा एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खूश नाहीत तर त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता सर्व सामान घेऊन पतीच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी पोहोचल्या आहेत.

Video : “आमच्या बेडरुमपर्यंत…” फोटोग्राफर्सना सैफ अली खान असं काही म्हणाला की करीनाही बघतच बसली अन्…

बबिता आणि रणधीर कपूर सोबत राहणार असल्याने त्यांच्या मुलीही आनंदी आहेत. कारण आता उतारवयात दोघंही एकाच छताखाली राहू शकतील आणि एकमेकांची काळजी घेऊ शकतील. दोघांनीही बराच काळ एकमेकांपासून अंतर ठेवलं. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले. अशा परिस्थितीत ३५ वर्षांनंतर त्यांचं पुन्हा एकत्र येणं ही सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे. रणधीर कपूर यांची तब्येत आता फार चांगली राहत नाही, त्यामुळे बबिता त्यांच्याजवळ असल्याने त्यांची व्यवस्थित काळजी घेता येईल.

रणधीवर व बबिता यांची लव्ह स्टोरी

रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांचे वडील राज कपूर यांना रणधीर कपूर यांच्या अफेअर बद्दल कळतात “तू तिच्याशी लग्न कधी करणार आहेस?” असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्या दोघांचा दोघांचाही लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता. पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.

गेली ३४ वर्ष पत्नीपासून घटस्फोट न घेता वेगळे राहतात रणधीर कपूर; ‘हे’ ठरलं मतभेदाचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणधीर व बबिता वेगळे का झाले?

८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. दारू पिण्याच्या सवयीमुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. तसेच मुलींनी चित्रपटात काम करावं, हेही रणधीर यांना मंजूर नव्हतं, त्यामुळेही त्यांच्यात वाद व्हायचे. अशातच १९८८ साली त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळे राहायला सुरुवात केली होती. आता तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र राहणार आहेत.