करीना कपूरचं उर्फी जावेदबाबत वक्तव्य, कौतुक करत म्हणाली “ती खूप हुशार आणि…”

करीना कपूरने उर्फी जावेदबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

kareena kapoor on urfi javed
करीना कपूरने उर्फी जावेदबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. अतरंगी कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी वायर तर कधी टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनविणाऱ्या उर्फीच्या कपड्यांवर अनेकांकडून आक्षेपही घेण्यात आला होता. आता याच उर्फीचं बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने कौतुक केलं आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

करीनाने नुकतीच झुम डिजिटलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने उर्फी जावेदबद्दल बोलताना तिचं कौतुक केलं आहे. “मी उर्फीसारखी धाडसी नाही. पण उर्फी प्रचंड धाडसी आणि खूप हुशार आहे, असं मला वाटतं. अभिव्यक्ती आणि बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजे फॅशन. ती ज्या आत्मविश्वासाने हे सगळं करते, त्यामुळे ती खूप कूल व छान दिसते”, असं करीना म्हणाली.

हेही वाचा>> “उर्फी जावेद तृतीयपंथी आहे” प्रसिद्ध अभिनेत्याचा अजब दावा; म्हणाला, “तिने…”

पुढे करीना म्हणाली, “उर्फी जावेद तिला जे हवं तेच करते, आणि यालाच फॅशन म्हणतात. मला आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्ती आवडतात. मी स्वत: एक आत्मविश्वास असणारी मुलगी आहे. मला उर्फीचा आत्मविश्वास आवडतो. हॅट्स ऑफ”. करीना कपूरने उर्फी जावेदबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

हेही वाचा>> “तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…” गिरीश बापट यांच्या निधनानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

करीना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाने २०१२ साली बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. तिला तैमूर व जेह ही दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:32 IST
Next Story
कंगनानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने दिला प्रियांकाला पाठिंबा; म्हणाले, “सुशांतप्रमाणे तिने…”
Exit mobile version