Story Behind Kareena Kapoor’s Nickname Bebo : करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. करीनाला इंडस्ट्रीत बेबो या नावानेही ओळखलं जातं. पण; तुम्हाला माहीत आहे का? तिला हे नाव कोणी दिलं आणि यामागे काय कारण आहे?

करीना कपूरचा आज ४५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त तिला बेबो हे नाव कोणी दिलं, यामागे काय कारण आहे जाणून घेऊयात. कपूर कुटुंबात प्रत्येकाला काही ना काही निकनेम आहे. रणधीर कपूर यांच्यापासून ते ऋषी कपूर यांच्या पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या मूळ नावाबरोबर एक निकनेमही आहे. ऋषी कपूर यांना चिंटू, करिश्मा कपूरचं लोलो अशी नावं आहेत. तसंच करीना कपूरलाही बेबो या नावाने ओळखलं जातं.

करीना कपूरला ‘या’ व्यक्तीने दिलेलं बेबो हे नाव

अभिनेत्री करिश्मा कपूरने बहिणीच्या या नावाबद्दल खुलासा केलेला. तिचं हे नाव कसं ठेवण्यात आहे याबद्दल ‘इंडियन आयडॉल’१५मध्ये सांगितलेलं. ती म्हणालेली, त्यांचे वडील रणधीर कपूर यांनी हे नाव ठेवलेलं. जेव्हा करीनाचा जन्म झालेला. त्यावेळी त्यांना छोटं पण गोड असं नाव हवं होतं म्हणून त्यांनी बेबो हे नाव सुचवलं आणि पुढे ते इकतं प्रसिद्ध झालं की, मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय, चाहते, मीडियातील लोक सगळेच तिला बेबो म्हणू लागले.

करीनाप्रमाणे करिश्माच्या लोलो या निकनेममागेही एक कास कारण आहे. करिश्माला लोलो म्हणतात कारण हे नाव तिच्या आईने ठेवलं आहे. लोलो हे नाव एका हॉलीवूड अभिनेत्रीच्या नावावरुन ठेवण्यात आलेलं. जीना लोलोब्रिगिडीया या हॉलीवूड अभिनेत्रीच्या नावावरुन लोलो हे नाव ठेवण्यात आलेलं.

दरम्यान, करीना कपूरने २००० साली ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता अभिषेक बच्चन झळकलेला. त्यानंतर अभिनेत्रीने ‘कभी खुशी कभी गम’, ‘जब वी मेट’, ‘गोलमाल’, ‘३ इडियट्स’, ‘चमेली’, ‘में प्रेम की दिवानी’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. नुकतीच तिला इंडस्ट्रीत २५ वर्षं पूर्ण झाली आहेत.