Sunjay Kapur’s Sister Talks About His Marriage With Karishma Kapoor : करिश्मा कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या एक्स पतीचं उद्योजक संजय कपूरचं निधन झालं. त्यामुळे करिश्मा तेव्हापासून चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता संजय कपूरची बहीण मंदिरा कपूर स्मिथने तिच्या भावाबद्दल व करिश्माच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
संजय कपूरच्या बहिणीने विकी ललवाणीसह संवाद साधताना तिच्या भावाच्या व करिश्माच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिने संजय कपूर व करिश्मा यांचं लग्न झालेलं असताना प्रिया संजयला सतत मेसेज करायची असं म्हटलं आहे. प्रियाबद्दल ती म्हणाली, “संजय करिश्माबरोबर लग्नबंधनात असताना प्रिया त्याला सतत मेसेज करायची आणि त्यावेळी तो त्याचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरू राहील यासाठी प्रयत्न करत होता, पण तेव्हा तो प्रियाने केलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करेल इतक्या चांगल्या परिस्थितीत नव्हता”.
“त्यांनी लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला” – संजय कपूरच्या बहिणीची प्रतिक्रिया
प्रिया सचदेवला दोषी ठरवत मंदिरा पुढे म्हणाली, “जेव्हा एका स्त्रीला (करिश्माला) एक मूल असतं आणि अजून एका मुलाला ती जन्म देणार असते, जेव्हा तुमचा (प्रिया) आधीच घटस्फोट झालेला आहे, तुम्हालाही एक मूल आहे, ती परिस्थिती किती त्रासदायक आहे याची जाणीव असतानाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा संसार कसा मोडू शकता? हे कसले संस्कार आहेत? ही कशी स्त्री आहे? जे काही असेल, पण प्रियाने या सगळ्यापासून लांब राहायला हवं होतं. त्यांनी त्यांचं लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला, त्यांना दोन मुलं होती. तेव्हा घटस्फोट झालेला असून तिलाही एक मूल होतं, तेव्हा प्रियाला एकटीने मुलाचा सांभाळ करणं किती कठीण आहे याची जाणीव असेलंच ना, मग तरीही असं दुसऱ्याचं कुटुंब का उद्धवस्त केलं.”
करिश्मा व संजय यांच्या वैवाहिक जीवनात नेमके काय अडथळे होते याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्यावेळी खूप गोष्टी चुकीच्या घडत होत्या. माझ्या वडिलांना त्या दोघांनी यावर काम करावं असं वाटत होतं. आम्ही सगळे त्याबद्दल चर्चा करायचो. करिश्मा संजयबरोबरच्या लग्नात फार आनंदी नव्हती याबद्दलसुद्धा मंदिराने सांगितलं आहे. करिश्माबद्दल ती म्हणाली, “ती पुन्हा मुंबईत काही काळासाठी गेलेली. ती संजयबरोबर आनंदी नव्हती, पण संजय त्यांच्या नात्यावर काम करत होता. स्त्री खूप खंबीर असते, पण पुरुष खूप कमजोर असतो.”
‘किड अँड काइंडनेस’शी संवाद साधताना संजय कपूरच्या पत्नीने प्रियाने म्हटलेलं की, संजय जेव्हा त्याचं व्यावसायिक जीवन आणि खासगी आयुष्य हे एकत्र सांभाळण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो मुंबई-दिल्ली असा अनेकदा प्रवास करायचा आणि त्यादरम्यानच त्यांची भेट झाली, त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि नंतर करिश्माबरोबर घटस्फोट झाल्यानंतर संजयने प्रियाबरोबर लग्न केलं.