अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिली. नव्वदच्या दशकामधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्माचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कामाबरोबरच करिश्माच्या खासगी आयुष्याबाबतही बी-टाऊनमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. २००६मध्ये तिने व्यावसायिक संजय कपूरबरोबर लग्न केलं. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतरच करिश्मा-संजयमध्ये वादाची ठिणगी पडली. तिने पती व त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोपही केले.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या रायने गाल ओढल्यानंतर रणवीर सिंगने चक्क तिच्या हातालाच केलं किस, लेक दोघांकडे पाहातच राहिली अन्…

करिश्माने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. करिश्माचं हे प्रकरण बरंच चर्चेत राहिलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार करिश्माने तिच्या याचिकेमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. करिश्मा जेव्हा गरोदर होती तेव्हा संजय तिच्यासाठी एक ड्रेस घेऊन आला.

करिश्माला तो ड्रेस परिधान करण्यास संजयने सांगितलं. पण करिश्माला हा ड्रेस शोभून दिसत नसल्याने संजयने तिला विचित्र वागणूक दिली. करिश्माच्या कानाखाली मार असं संजयने त्याच्या आईला सांगितलं. गरोदरपणातच करिश्माला अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अखेरीस २०१६मध्ये दोघांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – Video : भरपार्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्यासह Lip Lock करतानाचा व्हिडीओ समोर, रोमान्सही केला अन्…

घटस्फोटानंतर संजयने प्रिया सचदेवसह दुसरं लग्न केलं. पण करिश्मा अजूनही सिंगल मदर आहे. करिश्माला संजयपासून समायरा व कियान अशी दोन मुलं आहेत. आजही करिश्मा दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करते.