अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी करिश्मा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर एकत्र डिनर डेटवर गेल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

हेही वाचा- “हिंदू धर्माचा अपमान…,” OMG 2 मधील अक्षय कुमारचा लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप

यामुळे आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा रंगताना दिसत आहे. करिश्मा आणि संजय यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घ्यायचं ठरवलं. त्यावेळी या दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली. दोन्ही बाजूकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. करिश्माने तिच्या सासरकडच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप केले होते.

एका सुनावणीदरम्यान करिश्माने संजयवर गंभीर आरोप केले होते. करिश्मा म्हणाली, एकदा मला माझ्या सासूने एक ड्रेस भेट म्हणून दिला होता. पण त्यावेळी मी गरोदर होते. त्यामुळे तो ड्रेस तिला बसू शकत नव्हता. हे पाहून संजय एवढा भडकला की त्याने त्याच्या आईला मला थप्पड मारण्यास सांगितले. संजयने आईकडे पाहिले आणि म्हणाला तू तिला थप्पड का मारत नाहीस? एवढंच नाही तर करिश्माने असेही म्हटले होते की, संजयचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याची आई त्याला या सगळ्यात साथ देत असे. लग्नानंतरही संजयचे त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध असल्याचा आरोपही करिश्माने केला होता.

हेही वाचा- “जब तक है… मध्ये कतरिनाला किस करण्यासाठी मला..”; चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत शाहरुख खानचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या काही वर्षांमध्येच दोघे वेगळे झाले. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवाशी लग्न केलं. मात्र, घटस्फोटानंतर करिश्माने दुसरं लग्न केलं नाही. करिश्मा आणि संजयला एक मुलगा मुलगी आहे. समायरा आणि कियान अशी दोघांची नावे आहेत. ही दोन्ही मुलं करिश्माकडे असून ती त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करत आहे.