scorecardresearch

कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ पडला ‘पठाण’वर भारी, ‘या’ बाबतीत शाहरुखच्या चित्रपटाला टाकलं मागे

‘पठाण’ला चित्रपटगृहात टिकाव धरून राहण्यासाठी ‘शेहजादा’ला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ पडला ‘पठाण’वर भारी, ‘या’ बाबतीत शाहरुखच्या चित्रपटाला टाकलं मागे

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस चर्चा आहे. प्रेक्षकांनी अनेक दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर १० जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासातच चित्रपटाच्या ट्रेलरने यू ट्यूबवर काही लाख न्यूज मिळवले. पण आता कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाने पठाणला याबाबतीत मागे टाकलं आहे.

‘पठाण’प्रमाणेच कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा २०२३ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. १० फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि यू ट्यूब वरील व्यवसाय बाबतीत या चित्रपटाने ‘पठाण’लाही मागे टाकलं.

आणखी वाचा : तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल

‘पठाण’ या चित्रपटाच्या ट्रेलरला आत्तापर्यंत ४८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर शहजादा या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्व प्लॅटफॉर्म्सवरून ८५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. याबद्दल कार्तिक आर्यनने एक ट्वीट करत आनंद व्यक्त केला. त्याने लिहिलं, ” शेहजादा’चा ट्रेलर हा सर्वात जास्त पाहिला गेलेला आणि आवडला गेलेला ट्रेलर बनला आहे. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. या ट्रेलरला सर्व प्लॅटफॉर्म्सवरून आतापर्यंत ८५ मिलियन व्हूज मिळाले आहेत आणि त्यांची संख्या अजूनही वाढत आहे. हा ट्रेलर अजूनही पहिल्या नंबरवर ट्रेंड करत आहे.”

हेही वाचा : ‘चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आर्यनला दुखापत, फोटो शेअर करत म्हणाला…

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे, तर कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ १० फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात ‘पठाण’ला चित्रपटगृहात टिकाव धरून राहण्यासाठी ‘शेहजादा’ला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या