बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक मानला जातो. ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून कार्तिकला खरी ओळख मिळाली. पण त्याच्या कामाबरोबरच त्याचं नाव अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिलं. कार्तिकचं नाव आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. त्यातही सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी त्याचं अफेअर बरंच गाजलं होतं. पण नंतर दोघंही वेगळे झाले. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या प्लॅन बद्दल खुलासा केला आहे.

कार्तिक आर्यनला एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर त्याने त्याचं खासगी आयुष्य, कुटुंब आणि लग्न या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. सध्या ‘फ्रेडी’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत असलेला कार्तिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार अशा चर्चा होत्या. या सगळ्याच चर्चांना त्याने आता पूर्णविराम दिला आहे.

आणखी वाचा- कार्तिक आर्यन करतोय हृतिक रोशनच्या बहिणीला डेट? एकत्र लाँग ड्राईव्हला गेल्याची चर्चा

कार्तिकला या मुलाखतीत, ‘लग्नाबाबत तुझे भविष्यात काय प्लॅन आहेत? तू कधी आणि कोणाशी लग्न करणार आहेस?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “सध्या माझ्यावर लग्नाचं कोणतंही प्रेशर नाही. मी पुढची २-३ वर्षे तरी फक्त कामावर लक्ष केंद्रित करावं असं माझ्या आईला वाटतं. पण माझ्या आयुष्यात प्रेमासाठी खूप जागा आहे आणि मी वाट पाहतोय की कधी प्रेमात पडेन. पण अद्याप तरी तशी कोणतीच व्यक्ती मला भेटलेली नाही.” कार्तिकने असं म्हटलं असलं तरीही मागच्या काही दिवसांपासून तो हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

आणखी वाचा- “यापुढे काश्मिरी हिंदूंना टार्गेट केल्यास…” विवेक अग्निहोत्रींनी दिला थेट इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याच्या नवा चित्रपट ‘फ्रेडी’ अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिकबरोबर अभिनेत्री अलाया एफ मुख्य भूमिकेत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं समीक्षकांनी बरंच कौतुक केलं आहे. आगामी काळातही त्याचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत आणि या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.