विवेक अग्निहोत्री हे नाव सध्या चर्चेत आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अनेकांनी या चित्रपटाचे आणि विवेक अग्निहोत्रींचे कौतुक केले. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतदेखील होता. विवेक अग्निहोत्री सातत्याने बॉलिवूड, घराणेशाही यावर टीका करत असतात. ‘ताश्कंत फाईल्स’, ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. २ ऑक्टोबरचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील पुस्तक आता वाचकांच्या भेटीस येणार आहे. आपल्या ट्विटरवर अकाऊंटनवरून त्यांनी ही माहिती दिली.

ताश्कंत फाईल्स हा चित्रपट लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचेदेखील कौतुक झाला होते. याच धर्तीवर त्यांनी पुस्तक लिहले असून आपल्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत, ‘तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भारतातील सर्वोत्कृष्ट असे पुस्तक who killed shahstri आता हिंदी भाषेत उपलब्ध’, असं ट्विट करत पुस्तकाचा फोटोदेखील शेअर केला आहे.

एका मुलीच्या आत्मसन्मानाची लढाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! मालिकेचा प्रोमो चर्चेत

लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ताश्कंत येथे ते गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेचा अभ्यास करून ताश्कंत फाईल्स चित्रपट बनवला होता. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, नसरुद्दिन शाह मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता.

स्मरण : आगळावेगळा नेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द काश्मीर फाईल्स’नंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप केलं गेलेला नाही.